❤️सोलकढी❤️
नमस्कार मंडळी, शाकाहारी असो व मांसाहारी प्रत्येकाचं आवडत पेय म्हणजे सोलकढी चला तर मग, आपण जाणून घेऊया परफेक्ट सोलकढी कशी बनवायची. सोबतच मी सोलकढी बनवताना मला योग्य वाटतं असणाऱ्या टिप्स सुद्धा तुमच्या सोबत शेअर करत आहे . मला खात्री आहे आपणास रेसिपी व टिप्स दोन्ही आवडतील.
साहित्य :
१. नारळ - १
२. कोकम आगळ - अर्धी वाटी
३. लसूण पाकळ्या - ३ ते ४
४. जीरा पावडर - २ टी स्पून
५. कोथिंबीर - बारीक चिरून १ मोठा चमचा
६. मीठ - चवीनुसार
७. आल - एक लहान तुकडा (अर्धा इंच पेक्षा लहान तुकडा तसेच आल हे optional आहे ,फक्त थंडीच्या दिवसांत किंवा पावसाळ्यात वापरावं उन्हाळ्यात वापरू नये )
८. हिरवी मिरची - १ किंवा 2 तिखट आवडत असेल तर ३ ते ४ (पण माझ्या मते सोलकढी आंबट असावी जास्त तिखट नाही मी एक हिरवी मिरची मधोमध कापून सगळ्यात शेवटी सोलकढी मध्ये सोडतो आणि मग ती फ्रिज मध्ये ठेवतो पण आपण तिखट पणा साठी खोबरं मिक्सर मध्ये वाटून घेताना सुद्धा टाकू शकता.)
९. एक स्वच्छ सुती कापड किंवा मोठा रुमाल.
कृती
१. ओला नारळ किसून घेणे विळी नसेल तर ओला नारळाचे बारीक तुकडे करून घ्यायचे.
२. किसलेले किंवा बारीक कापलेले खोबरे मिक्सर जार मध्ये काढून घेणे त्यात हिरवी मिरची , लसूण पाकळ्या आणि आले मिक्सर मध्ये २ ते ३ मिनीटे फिरवून घेणे .
३. एक पातेले घेऊन त्यावर रुमाल.किंवा सुती कापड पसरवून त्यात मिक्सर मधील मिश्रण काढून घेणे.
४. रुमाल चारही बाजूंनी बंद करून घट्ट पिळून घ्यावा जेणेकरून नारळाचे दूध पातेल्यात जमा होईल. हे फर्स्ट प्रेस चे नारळ दूध आहे.
५. पिळून घेतलेलं खोबरे एक ग्लास पाणी घालून पुन्हा मिक्सर मध्ये फिरवून घेणे व ते पुन्हा रुमलातून गाळून घ्यावे म्हणजे सोलकढी फार दाट होत नाही पचायला हलकी होते . हे सेकंड प्रेसचे नारळाचे दूध आहे.
६. आता नारळाच्या दुधात चवीनुसार मीठ, जीरा पावडर , कोथिंबीर व कोकम आगळ मिक्स करून घेणे.
कोकम आगळ थोडे थोडे करून घालावे जेणे करून गुलाबी रंग आणि आंबट चव याचा योग्य मेळ बसेल. सोलकढी 1 तास थंड करून मग सर्व करावी.
( सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी मिक्सर मध्ये खोबरं बारीक करताना त्यात एक लहान तुकडा बीट सुद्धा वापरतात )
रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा.
माझा ईमेल आयडी आहे.
amahi0014@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा